Friday 27 September 2013

गुंतल्या रे वेड्या मना

गुंतल्या रे वेड्या मना

बघ नयनी तू माझ्या,
तोच धुंद पावसाळा,
भिजून घे चिंब जरा,
देह असा तहानेला......

छेड पुन्हा एकदा तू,
नाजुकशा पाकळ्यांना,
बघ आठवून जरा,
शहारल्या त्या क्षणांना.....

सख्या नकोस  हरवू ,
गर्द धुक्यांत स्वतःला,
बघ पल्याड जरासा,
ऋतू भरात आलेला ……

न्हाहून घे चांदराती,
नको विझवू तारका,
संधीकाली येते पहा
आर्त स्वरातील हाका  ……

गुंतल्या रे वेड्या मना,
नको रोखू श्वास असा,
सोड अंधार मनीचा,
जरा लांब घे उसासा ……

मिलिंद कुंभारे

Tuesday 24 September 2013

ग़ज़ल

ग़ज़ल

कहूँ तो क्या कहूँ ?
तुम्हे मैं
कल्पना कहूँ,
ग़ज़ल कहूँ,
या कविता कहूँ .........

नाम से कल्पना कहलाती हो,
पर यथार्थ में विस्वास रखती हो,
छवि छोटीसी दिखती हो,
पर सोच बड़ी तुम रखती हो ........

राह कितनी भी कठिन हो,
कभी न तुम डगमगाती हो,
सच्चाई की राह चलती हो,
निगाहें ऊँची, हौसलें बुलंद रखती हो .......

रातें तनहाइयों में गुजारा करती हो,
पर दिन में सारा जहाँ साथ लिए चलती हो,
गम ए ग़ज़ल दिल में छिपाएं, सदा मुस्कुराती हो,
वक्त को पीछे छोड़, समय से आगे तुम रहती हो ............

मेरी कविता में महज तुम एक कल्पना हो,
पर न जाने क्यूँ, दिल कहता हैं,
शायद, अपने आपमें, लम्हों में बिखरी हुईसी,
तुम एक ग़ज़ल हो ...........

मिलिंद कुंभारे

Friday 20 September 2013

पाऊस अंतरीचा

पाऊस अंतरीचा 

अबोल त्या भावना,
शब्दांत मी गुंफता,
पाऊस अंतरीचा,
नयनातून बरसला ….

मिलिंद कुंभारे

काळरात्र….

काळरात्र…


स्वप्नी मी
असा रंगलेला,
रात्र ती काळोखी,
वाट ती अंधारलेली,
ध्येयवेडा मी,
घेतली स्वैर भरारी!

तुटलेल्या पंखांची,
जेव्हा जाण झाली,
तेव्हा हळूच जाग आली,
भांबावलेल्या नयनांना,
उष:कालाची प्रतीक्षा होती,

पण छे,
काळरात्रच होती ती!

मिलिंद कुंभारे

Wednesday 18 September 2013

गूढ जीवनाचे

गूढ जीवनाचे


वळणे जीवनी
कितीच असती
कधी  साधे सोपे
काही आड रस्ते

कंपने  धरणी
उधाण सागरी
भय ते मृत्यूचे
मज क्षणोक्षणी

कधी वाटतसे
स्वच्छंदी जगावे
घ्यावे ठरवून
आयुष्य आपले

गीत जीवनाचे
तुजसवे गावे
गूढ जगण्याचे
उमजून घ्यावे

मिलिंद कुंभारे

Saturday 14 September 2013

धुंद नशा

धुंद नशा
धुंद नशा

डोळ्यांत तुझ्या धुंद नशा,
अन बेधुंदशा साऱ्या दिशा,
श्वास  माझा मी रोखू कसा ….

दृष्टीपुढे सारखी छवी तुझी,
अन जादुई  तुझी अदा,
श्वास  माझा मी रोखू कसा ….

ओठ तुझे गुलाबी पाकळ्या,
यौवनाचा एक मधुर प्याला,
श्वास  माझा मी रोखू कसा ….

मन माझे वेडे पिसे,
अन एकांत हा जीवघेणा,
श्वास  माझा मी रोखू कसा ….

वाटते प्यावे माधुरी तुझी,
तुझ्यासवे व्हावे बेधुंद मी,
अन सोडावा उश्वास जरासा….

मिलिंद कुंभारे