Friday 7 March 2014

स्त्रीमन

 स्त्रीमन

नको करूस असे भावनांना पापण्यांत कैद
उघड मनाची सारी बंद दांर......
बळ पराकोटीचे तुझ्या पंखांत
तुजसाठी आज मोकळे सारे आभाळ......
घे भरारी, कर सार्थक स्त्रीजन्माच
शोध तू एक नवीन वाट
गवसेल बघ तुला एक नवीन पहाट.....
सरतील काळरात्री, बदलतील युग………

स्त्रीमन म्हणजे एक झरा
प्रेमाचा, वात्सल्याचा,
सतत पाझरणारा,
कधीही न आटणारा…।

महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्या

मिलिंद कुंभारे