धुंद नशा |
डोळ्यांत तुझ्या धुंद नशा,
अन बेधुंदशा साऱ्या दिशा,
श्वास माझा मी रोखू कसा ….
दृष्टीपुढे सारखी छवी तुझी,
अन जादुई तुझी अदा,
श्वास माझा मी रोखू कसा ….
ओठ तुझे गुलाबी पाकळ्या,
यौवनाचा एक मधुर प्याला,
श्वास माझा मी रोखू कसा ….
मन माझे वेडे पिसे,
अन एकांत हा जीवघेणा,
श्वास माझा मी रोखू कसा ….
वाटते प्यावे माधुरी तुझी,
तुझ्यासवे व्हावे बेधुंद मी,
अन सोडावा उश्वास जरासा….
मिलिंद कुंभारे
No comments:
Post a Comment
अप्रतिम, सुंदर, छान