Wednesday, 17 June 2015

आस वेडी जगण्याची

ही कविता ४२वर्षे मृत्त्युशी झुंजणाऱ्या अरुणा nurse ला समर्पित......

आस वेडी जगण्याची

थिजलेल्या डोळ्यांत तिच्या
गोठलेला पाऊस होता
अधांतरिच आयुष्याच्या
श्वास जणू थांबला होता........

आसवे जरी आटली
नजर मात्र होती बोलकी
ती झुंज होती मृत्युशी
कि आस वेडी जगण्याची..........

स्वप्ने सारी राहिली अधूरी
कोरडाच सारा जन्म जाहला
मेघ नाही कधीच बरसला
नाही कळले कधी संपला प्रवास तिचा...........

अनुत्तरित  एक प्रश्न मनाला
जगण्यावर करावे मी प्रेम कितीदा?
का अव्यक्त असाव्या व्यथा वेदना ?
तेव्हा का नसावा मृतत्युचा मार्ग मोकळा ?

मिलिंद कुंभारे

No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान