Friday, 16 June 2017

आजही का तू किनाऱ्याशी?

आजही का तू किनाऱ्याशी?

सांजवेळी आज पुन्हा सावली होऊन तू
का अताशा छेडते? ते धुंद सुमधुर गीत तू .....

रंगली सूरेल आहे गीतसंध्या अजुनही
चंद्र तारे आसमंती, तूच तू का अंतरी? .....

भास का वेळी अवेळी? सांगना आहेस तू
प्रेम माझे तूच पहिले, श्वास माझा तू जणू ......

साचलेल्या वेदनांना मी सखे रोखू कसे?
आजही का तू किनाऱ्याशी? तळ जरा गाठ तू ......

साद माझी ऐकना, मंदावल्या जर तारका
ज्योत तू हो ना, विसर अंधार, हो तू काजवा ......


                        मिलिंद कुंभारे  

No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान