Monday, 29 April 2013

स्वप्नधुन्दि

स्वप्नधुन्दि

स्वप्नधुन्दितलि  तू स्वप्नसुंदरी !
फुलाबागेतली तू फुलराणी !
सोडून स्वप्नील दुनिया ;
मनोवनात माझ्या
अवतरशील का ?
रुक्ष जीवनात माझ्या ;
वसंत होऊन
बहरशील का?

कवीमनाची माझ्या
तूच नायिका !
चित्रशैलीत माझ्या
तुझीच प्रतिमा !
काव्यास माझ्या;
साथ सुरांची
देशील का?
चित्रांत तुझ्या
रंग उमेदीचे
उधळ्शील का?

अथांग भवसागरात
उभी ती प्रीतनौका!
दिशाशून्य असा मी
तीत एकटाच का?
तुजप्रीतीच्या लाटांचा
सहारा मज देशील का?
भटकलेला मी!
किनारा मज दावशील का?

मिलिंद कुंभारे

Friday, 26 April 2013

तुझा ध्यास!

तुझा ध्यास!
तुझा ध्यास!

वाटलं होतं
वादळी आयुष्यात माझ्या
तू पाऊस घेऊन येशील!
वळणा-वळणावर थांबलेल्या
जीवनाचा,  तू एक प्रवाह असशील!
विस्कटलेल्या त्या प्रत्येक नात्याचं
तू एक संकुल बनवशील!
मला कधीही न कळलेल्या
त्या प्रेमाची;
तू परिभाषा असशील!
निरर्थक, नाउमेद जगण्यास माझ्या
तू एक श्वास ठरशील!

पण वाटलं नव्हत
माझं अख्खं भावविश्वच तू
तुझ्या तळहातावर अलगद पेलशील!
मनाच्या गाभाऱ्यात माझ्या
तू एक प्रेमांकुर पेरशील!
अन वाळवंटी आयुष्यात माझ्या
तू दोन गुलाब उगवशील!
रुक्ष जीवनाचं माझ्या
तू नंदनवन करशील!

वाटलं नव्हतं
वादळी आयुष्यात माझ्या
तू पाऊस घेऊन येशील!

मिलिंद कुंभारे

गर्द ओल्या अंधारी!

गर्द ओल्या अंधारी!
गर्द ओल्या अंधारी!

Tuesday, 23 April 2013

म्हातारीची गोष्ट

म्हातारीची गोष्ट
म्हातारीची गोष्ट

कोपऱ्यातल्या घरात
रहाते एक म्हातारी
उग्र चिडकी संशयी
तरीहि आहे बिचारी १
म्हातारीने पोरा होते 
इंजिनिअर केलेले 
तळहातावर होते
जणू काही सांभाळले  २
गरिबीच्या गटारात
दिवस होते काढले
मुलामध्ये भविष्याचे
सुंदर स्वप्न पाहिले ३
होता होता स्वप्न पुरे
नि टर्रकन फाटले
तिचे जीवन सर्वस्व
कुणीतरी हिरावले ४
भूल घालूनिया त्याला
दूरच्या देशात नेले
जादूच्या महालात नि
बेहोष बेधुंद केले ५
म्हातारीने मग सारे
जग पालथे घातले
पोरासाठी देव सारे
पाण्याखालीही ठेवले ६
राजा प्रधान सचिव
यंत्री तंत्री जादुगार
यांच्याकडे पोरासाठी
केले प्रयत्न अपार ७
यत्न फळत नव्हते
दिन सरत नव्हते
म्हातारीचे दु:ख अन
सतत वाढत होते ८
भेटेल त्याला म्हातारी
ते दु:ख सांगू लागली
जादूगारी सुंदरीला
त्या शिव्या देवू लागली  ९
गुणी बाळ माझा परी
भोळा म्हणत राहिली
तेच ते ऐकुनि तिला
सारीच टाळू लागली १०
वेडी झाली म्हणे कुणी
हळूच हसू लागली
सहानुभूतीने कुणी
कणव करू लागली ११
हळू हळू म्हातारी ती
अगदी एकटी झाली
आपली हार मनात
तिला कळून चुकली १२
म्हातारी मग अधिक
संशयग्रस्त बनली
साऱ्याच जगा रागाने
शापच देवू लागली १३
भुताटकीच्या घराला
कळा भयानक आली
तिची बेल वाजविण्या
सारी घाबरू लागली  १४
म्हातारीचा पोर आता
धनवान झाला होता
पोराबाळात आपल्या
चांगला रमला होता १५
गाडी घर पैसा सार
अगदी मजेत होता
म्हातारीला पैसा अन
देऊही करत होता १६
म्हातारीला सोन्याचे ते
पण अंड नको होते
कोंबडी सकट तिला
तिचे घर हवे होते १७
तिला तिच्या रक्ताचे
तिला तिच्या हक्काचे
तिला तिच्या कष्टाचे
सारे फळ हवे होते  १८
कितीतरी दिवस हे 
नाटक चालले होते
म्हातारीचे वणवण
भटकणे चालू होते  १९
एक दिवस कावून
ये म्हातारा गावाहून
नि तिची मोट बांधून
गेला तिजला घेवून २०
जाता जाता मला तेव्हा
स्पष्टच सांगून गेला
माझ्या साठीतरी आहे
आता पोर माझा मेला २१
उदास शून्य म्हातारी
काहीच नाही बोलली
डोळ्यात तिच्या विझली
तेव्हा लंका मी पाहिली  २२
पण माझी खात्री आहे
ती नक्की पुन्हा येणार
टाहो फोडत सर्वत्र 
पोरासाठी धावणार २३
मुलासाठी झगडणे
हे आता झाले जीवन
जीवनाला अर्थ आला
जणू की अर्थावाचून  २४
आज जरी सुटकेचा
एक निश्वास टाकून
संपला म्हणतो त्रास 
जातो तिज विसरून २६
कधीतरी मनामध्ये
म्हातारी मज दिसते
स्वप्न मुलानातवांचे
नि खळ्ळकण फुटते   २७

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गोठलेला पाऊस

गोठलेला पाऊस
गोठलेला पाऊस

Saturday, 20 April 2013

आई

आई
आई!

सखा तुझा
अधांतरीच तुला
सोडून गेला!
वाटलं प्रवास आता
संपला तुझा!

पण न खचता
खेळलीस तू;
आयुष्याची
एक झुंजार खेळी!

अशातच
प्रवास तुझा कधी थांबला;
तुला कधी कळलेच नाही!

आता शब्द तुझी गोठलीत;
आसवहि थिजलित!
पण नजर तुझी
सदैव भिरभिरती!

घरट्यातली  पाखरें;
केंव्हाच गगनभैर झाली;
कधीही न परतण्यासाठी!
पण तरीही;
नजर तुझी
सदैव भिरभिरती!
कुणास ठाऊक?
कुणासाठी?
कशासाठी?

आई सांग  मज
आजच्या दिवशी;
वाहू कसा मी;
तुज श्रद्धांजली!
आठवणींचा पाऊस
पापण्यांपलीकडेच आटवू;
कि ढसा - ढसा
रडूं मी!

मिलिंद कुंभारे

ते वयच तसे असते!

ते वयच तसे असते!
ते वयच तसे असते!

खळाळनाऱ्या
धबधब्यासारखे!
हसते, खिदळते,
वाट सापडेल,
तिथे पळते!
भान नसे,
त्याज कुणाचे,
भय नसे,
त्याज कुठले!
ठेच लागून,
कित्येकदा पडते!
अन,
स्वत:च स्वत:ला,
पुन्हा पुन्हा सावरते!
राग, लोभ,
मोह, माया,
त्यज नसे,
निरागस असते,
सारे कसे!

बघता बघता,
ते तारुण्य गाठते!
अन
मन फुलपाखरू होते,
उंच, उंच उडते!
आता नसती त्याची,
धरतीवर पाऊलें!
स्वप्नातच ते रमते,
तिच्यातच ते गुंतते,
त्याच्याशीच ते बोलते!

कळतच नाही, कधी ते
वार्धक्य येउन ठेपते!
आता
तन थकलेले,
मन खचलेले,
व्यथा, वेदनांचे,
नयनी मेघ दाटलेले!
अन
ऋतू आयुष्यातले,
सगळेच हरवलेले!

ते वयच तसे असते!
ते वयच तसे असते!
ते वयच तसे असते!

मिलिंद कुंभारे

Friday, 19 April 2013

प्रश्नचिन्ह?




प्रश्नचिन्ह?
प्रश्नचिन्ह!

स्वप्नी माझ्या
रोज येतेस तू
घेऊन एक
प्रश्नचिन्ह?

नको नको म्हणताना
तोच हट्ट करतेस तू!
मनातल्या व्यथा
मनातच दडवत;
प्रश्नांचा गुंता करतेस तू!
शब्द तुझे गोठले असताना;
आसवांचाच पाऊस
पाडतेस तू!

ओसंडून जाऊ दे
बांध मुक्या भावनांचा
कदाचित तो प्रवाह
शोधील एक चोरवाट;
जी घेईल ध्यास
तुझ्या अंतरीच्या
अव्यक्त वेदनांचा!

तेव्हा नसतील कुठलेच प्रश्नचिन्ह!
असेल फक्त एक जिव्हाळा
जसा रानावनातला गारवा!
कदाचित
असेल ती एक निखळ मैत्री
दिव्यातल्या धगधगत्या ज्योतीसारखी!
किंवा
असेल ते एक अतूट बंधन
प्रीतीच्या धाग्यांनी घट्ट गुंफलेलं!
कधीही न तुटणार!
कधीही न सुटणार!

पण  नसतील कुठलेच प्रश्नचिन्ह!
असेल फक्त एक प्रवास;
सहज, सोपा
शून्याकडून जीवनाकडे वळणारा!
कदाचित
असेल तो एक सहप्रवास;
चार पावलांचा, चार कप्यापलीकडला!
तुझ्या - माझ्या मनाचा
शिखर अन क्षितीज गाठणारा!


स्वप्नी माझ्या
आता तू येऊ नकोस!
प्रश्नांचा गुंता वाढवू नकोस!
तुझ्याशिवाय मी जगावे
कि माझ्याशिवाय तू जगावे;
मला न उमगलेलं
ते एक सत्य असावं!
अर्धसत्य!
कि
पुन्हा एक प्रश्नचिन्ह?

मिलिंद कुंभारे

Wednesday, 17 April 2013

स्याही संपली म्हणून

 
स्याही संपली म्हणून

 स्याही संपली म्हणून

स्याही संपली म्हणून,
सोडू नकोस तू,
कविता लिहायचा!
शोधू नकोस तू,
पेन दुसरा तिसरा!
रक्ताच्या थेंबा थेंबानी,
लिही तू कविता!
अन ओसंडून जाऊ दे,
नयनी गोठलेल्या भावनांना!

 मिलिंद कुंभारे

अनुबंध

अनुबंध

मराठमोळी तू!

 
मराठमोळी तू!


मराठमोळी तू!

 मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!
श्रुंगार तुझा साधाच गं!

गळ्यात शोभती  एकदाणी,
अन पायांत वाजती पैंजण,
जणू छेडती धुंद मधुर सूर गं!
भरजरीचा हिरवा शालू,
अन डोळें मिटून लाजणं,
गालांवर हंसू गोड गं!
कपाळी शोभती लाल कुंकू,
सौभाग्याचं जणू मुकुट गं!
नाकामध्ये
नथ मोत्यांची,
शोभते जशी तू,
चंद्राची गं चांदणी!
काळ्याभोर केसांमध्ये
गुंफती गजरा मोगऱ्याचा,
दरवळीत गंध,
मराठमोळ्या गं मातीचा!
भाव भोळे चेहऱ्यावरती,
अन प्रीत तुझी,
अमृतापरी गोड गं!
मन तुझे,
फुलांपरी कोमल गं!
आभाळागत माया तुझी,
जशी भर उन्हांत,
सावलीचा अंश गं!

मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!
श्रुंगार तुझा साधाच गं!

मिलिंद कुंभारे