Wednesday 17 April 2013

मराठमोळी तू!

 
मराठमोळी तू!


मराठमोळी तू!

 मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!
श्रुंगार तुझा साधाच गं!

गळ्यात शोभती  एकदाणी,
अन पायांत वाजती पैंजण,
जणू छेडती धुंद मधुर सूर गं!
भरजरीचा हिरवा शालू,
अन डोळें मिटून लाजणं,
गालांवर हंसू गोड गं!
कपाळी शोभती लाल कुंकू,
सौभाग्याचं जणू मुकुट गं!
नाकामध्ये
नथ मोत्यांची,
शोभते जशी तू,
चंद्राची गं चांदणी!
काळ्याभोर केसांमध्ये
गुंफती गजरा मोगऱ्याचा,
दरवळीत गंध,
मराठमोळ्या गं मातीचा!
भाव भोळे चेहऱ्यावरती,
अन प्रीत तुझी,
अमृतापरी गोड गं!
मन तुझे,
फुलांपरी कोमल गं!
आभाळागत माया तुझी,
जशी भर उन्हांत,
सावलीचा अंश गं!

मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!
श्रुंगार तुझा साधाच गं!

मिलिंद कुंभारे

No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान