Saturday, 20 April 2013

आई

आई
आई!

सखा तुझा
अधांतरीच तुला
सोडून गेला!
वाटलं प्रवास आता
संपला तुझा!

पण न खचता
खेळलीस तू;
आयुष्याची
एक झुंजार खेळी!

अशातच
प्रवास तुझा कधी थांबला;
तुला कधी कळलेच नाही!

आता शब्द तुझी गोठलीत;
आसवहि थिजलित!
पण नजर तुझी
सदैव भिरभिरती!

घरट्यातली  पाखरें;
केंव्हाच गगनभैर झाली;
कधीही न परतण्यासाठी!
पण तरीही;
नजर तुझी
सदैव भिरभिरती!
कुणास ठाऊक?
कुणासाठी?
कशासाठी?

आई सांग  मज
आजच्या दिवशी;
वाहू कसा मी;
तुज श्रद्धांजली!
आठवणींचा पाऊस
पापण्यांपलीकडेच आटवू;
कि ढसा - ढसा
रडूं मी!

मिलिंद कुंभारे

No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान