Wednesday 1 May 2013

निःशब्द


निःशब्द

काळोखलेल्या असताना;
साऱ्याच वाटा;
दूर कोठेतरी;
उजेड दिसला!
वाटलं, झोपडीत तुझ्या;
तेवणारा दीप असावा;
पण भुरळ घाली;
लुकलुकता काजवा तो;
समीप जाता;
दूर जाहला;
सोडून मागे;
अंधार सारा!

आठवणींच्या विश्वातून;
दूर लोटले जेव्हा स्वतःला;
क्षणभर स्तब्ध झाल्या;
सगरीच्या त्या
सळसळत्या लाटा!
स्तब्ध झाली पानें  फुलें!
अन स्तब्ध आसमंत सारा!
अशातच वाऱ्याची;
ती सहज झुळूक;
अस्तब्ध करून गेली;
त्या शांत लाटांना!
अन उफाळून गेली;
मज अंतरीच्या वेदनांना;
अन मनी कोंडलेल्या
भावतरंगांना!

कधीकाळी मीच छेडलेल्या;
त्या बेसूर तारा;
अस्वस्थ करीत होत्या;
मज हळव्या मनाला!
आता
गांव मनातले थांबले होते;
सरल्या वाटेवरती;
अन थांबली होती;
तुजसवे गायलेली;
ती  कित्येक गाणी!

आता
जणू शब्द गोठलीत माझी;
थिजलित आसवंही सगळी;
अन
निःशब्द झालोय मी
कायमचा!

मिलिंद कुंभारे


No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान