Friday, 3 May 2013

तुझ्या सावल्या!


तुझ्या सावल्या!

जाणवतो तुझा रितेपणा
जेव्हा जेव्हा मला;
काळोखीच भासू लागते;
पौर्णिमेची ती रात्र!
अन बेसुरीच असते;
 रंगलेली ती मैफल!

कळतच नाही
रविकिरणांची उधळण करीत;
केव्हा उगवते नवीन पाहट!
आता असतो मनी माझ्या;
फक्त तुझा ध्यास!
अन सुरु होतो एक प्रवास!

तेव्हा गर्दीतही असतो मी एकटा;
शोधीत फक्त पाऊल-वाटा;
तुझ्या वास्तूकडे जाणारया!
अवती भवती मला वेढलेल्या;
तुझ्या त्या अबोल सावल्या;
बेचैन करतात मज हळव्या मनाला!

पाठलाग करत तव फसव्या सावल्यांचा;
येउन पोहोचतो, दूर कोठेतरी!
तेव्हा सुर्य अस्ताला गेलेला!
अन मीही स्थिरावलेला!
अगदी एकाकी एकटा!

आता सोबतीला असतात
सागराच्या त्या स्तब्ध लाटा;
धुसर-धुसर दिसणाऱ्या वाटा;
अन मंदावलेल्या त्या तारका!

आता सोबतीला असते;
एक काळोखी रात्र!
तिच्या असण्याची एक चाहूल;
तिच्या नसण्याची  मात्र मनी एक खंत!

मिलिंद कुंभारे


1 comment:

  1. आता सोबतीला असते;
    एक काळोखी रात्र!
    तिच्या असण्याची एक चाहूल;
    तिच्या नसण्याची मात्र मनी एक खंत!heart touching lines

    ReplyDelete

अप्रतिम, सुंदर, छान