Monday, 6 May 2013

ध्यास मनाचा


ध्यास मनाचा 

कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं!
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!

कवितेत माझ्या
एक रम्य संध्याकाळ असते;
चांदण्यांचा  सडा असतो;
एक गुलाबी स्वप्न असते;
अन
स्वप्नात हरवलेलं
एक हळवं मन असतं!

कवितेत माझ्या
भावनांचा सागर असतो;
सागराचा किनारा असतो;
कडेला एक वयोवृद्ध झाड असतं!
अन
रस्ता हरवलेली
एक नांव  असते!

कवितेत माझ्या
एक कोरा कॅनवास  असतो;
त्यात लपलेली तीची प्रतिमा असते;
हातात एक ब्रश असतो!
अन
उमेदीचे रंग उधळणार
एक बेधुंद मन असतं!

कवितेत माझ्या
काहीच नसतं!
चोरटे शब्द असतात!
खराखुरा मात्र एक भाव असतो!
तुझ्या - माझ्या मनाचा
तो एक ध्यास असतो!
तुझ्या - माझ्या मनाशी
साधलेला तो एक संवाद असतो !

मिलिंद कुंभारे


No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान