Wednesday 8 May 2013

गुलाबी पाकळ्या

गुलाबी पाकळ्या

गुलाबी पाकळ्या

नाजूक गुलाबी पाकळ्यामधून,
हलकेच ओघळताना, मधाचा,
एक थेंब दिसला!
क्षणभर मज कळेना,
आधी मध प्राशन करू,
कि पाकळ्याशी खेळू!
क्षण ओझरला, ऋतू बदलला,
पाकळ्या साऱ्या कोमेजल्या!
स्तब्ध मी, मज काही सुचेना,
आर्त स्वर एक, मनी कुजबुजला,
क्षणात मज आठवला,
मी चाखलेला, तो थेंब मधाचा!
नयनी दाटला, ऋतू एक ओघळला,
अन पाकळ्या साऱ्या फुलल्या!
क्षणभर मज कळेना,
कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या!

मिलिंद कुंभारे


गुलाबी पाकळ्या

1 comment:



  1. गुलाबी पाकळ्या

    गुलाबी पाकळ्या
    गुलाबी पाकळ्या

    नाजूक गुलाबी पाकळ्यामधून,
    हलकेच ओघळताना, मधाचा,
    एक थेंब दिसला!
    क्षणभर मज कळेना,
    आधी मध प्राशन करू,
    कि पाकळ्याशी खेळू!
    क्षण ओझरला, ऋतू बदलला,
    पाकळ्या साऱ्या कोमेजल्या!
    स्तब्ध मी, मज काही सुचेना,
    आर्त स्वर एक, मनी कुजबुजला,
    क्षणात मज आठवला,
    मी चाखलेला, तो थेंब मधाचा!
    नयनी दाटला, ऋतू एक ओघळला,
    अन पाकळ्या साऱ्या फुलल्या!
    क्षणभर मज कळेना,
    कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
    कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
    मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या!

    मिलिंद कुंभारे







    अप्रतिम, सुंदर, छान

    ReplyDelete

अप्रतिम, सुंदर, छान