निवडुंग!
निवडुंग! |
अपयश,
मनाच्या वाळवंटात,
उगवलेलं निवडुंग!
बोचतंय मला रात्रंदिवस,
असह्य करतंय,
जगणं माझं!
सूर्य रोज उदयास येतो,
उधळीत आशेची किरणं!
पण डोळ्यांसमोर माझ्या,
फक्त निराशेचं धुकं!
झुरतय मन,
बघाया धुक्यांआड,
लपलेला वसंत!
पण किळसवानं, अर्थहिन
असतंय ते जगणं,
अगदी एकाकी एकट,
शोधीत हरवलेलं,
स्वतःचच अस्तित्व!
कधी वाटतं करून टाकावा,
त्या क्षणभंगुर जीवनाचा अंत!
पण तेही असतं अवघड!
मग उरतंय,
एकट्याचच एकलकोंड विश्व!
शून्यात अडकलेलं,
जिथं सोबतीला असतं,
फक्त निवडुंग!
अन
बोचणाऱ्या काट्यांची,
गोळा-बेरीज करत,
कसं -बसं मरत-मरत जगणं!
जणू न उमगलेलं एक कोडं!
मिलिंद कुंभारे
No comments:
Post a Comment
अप्रतिम, सुंदर, छान