Thursday 2 May 2013

पावसाळा!


पावसाळा!

कळतच नाही;
हरवतो कुठे;
गंध ओल्या मातीचा;
अन केव्हा संपतो;
पावसाळा!

आता ग्रीष्म;
आयुष्याला चिकटलेला;
मंजिल जवळ असताना;
रस्ता मात्र लांबलेला!

आता
ओंजळीतलं चांदणं निसटलेलं
उंच उंच भरारी घेणारं मन;
थांबलेलं, खचलेलं
अन
पायाखालची वाळू सरकल्यागत होतं!
पुनवेच्या रातीचं स्वप्न धुक्यांआड विरून जातं!

तरीही का कुणास ठाऊक;
माणूस मात्र जगत असतो;
जगण्यासाठी रोज रोज मरत असतो!
सागरातल्या लाटांमधला जिवंतपणा;
डोळ्यांत साठवत;
मनात दाटलेला पाऊस;
पापण्याआड दडवत;
तो मात्र आसुसलेला;
जणू
कित्येक दिवसांचा तहानलेला;
पुन्हा एकदा
त्याच पावसात चिंब भिजायला!
शोधीत पुन्हा
हरवलेला गंध तो ओल्या मातीचा!

मिलिंद कुंभारे

No comments:

Post a Comment

अप्रतिम, सुंदर, छान